घरCORONA UPDATECoronavirus In Maharashtra: ११ हजार नवे रुग्ण; रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७२...

Coronavirus In Maharashtra: ११ हजार नवे रुग्ण; रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७२ टक्के

Subscribe

राज्य सध्या अनलॉक प्रक्रियेतून जात असले तरी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. राज्यात आज ११ हजार ८५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७,९२,५४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आज १,९४,०५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २४ हजार ५८३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४ हजार ०५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९२९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -