घरमुंबईअखिल भारतीय महानुभाव महामंडळाचे उपाध्यक्ष नानाजी ढवंगाळे यांचे निधन

अखिल भारतीय महानुभाव महामंडळाचे उपाध्यक्ष नानाजी ढवंगाळे यांचे निधन

Subscribe

अखिल भारतीय महानुभाव महामंडळाचे उपाध्यक्ष नानाजी ढवंगाळे यांचे आज सोमवारी सकाळी हृद्यविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७७ वर्ष होते. नागपूर येथील किंग्जवे रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, अजय आणि विजय ही दोन मुले, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. नागपूर येथे त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

नानाजी ढवंगाळे हे अखिल भारतीय महानुभाव महामंडळाचे उपाध्यक्ष होते. ते अत्यंत धर्मनिष्ठ होते. तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. साध्या व सरळ स्वभावामुळे अनेकांचे ते लाडके होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या स्वकियांबरोबरच हितचिंतकानांही धक्का बसला आहे. नानाजी ढवंगाळे एक सच्चे निर्भिड आणि कर्तव्यकठोर व्यक्तिमत्व होते. त्यांनी आजन्म आपल्या वागण्या बोलण्यातून आचरणातून समाजासमोर आदर्श घालून दिला होता. ते मुळातच श्रद्धावान होते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांचे ते सच्चे उपासक होते. धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतं.

- Advertisement -

धर्मातील गहन तत्वांचा त्यांचा अपार अभ्यास होता. समाजालाही हे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी दोन पुस्तकही लिहली होती. नानाजी अखिल भारतीय महानुभाव महामंडळाचे, नागपूर उपाध्यक्ष होते परंतु गेली कित्येक दशके ते याच मंडळातील विविध पदांवर यशस्वीपणे कार्यरत राहिले होते. रामटेक येथील श्री चक्रधर देवस्थान भोगराम विश्वस्त कमिटीचे ते अध्यक्ष होते. जागतिक महानुभाव वासनिक परिषदचे ते उपाध्यक्ष होते. सांस्कृतिक श्री चक्रधर मंदिर, अयोध्या नगर, नागपूर येथे सदस्य होते. ठिकठिकाणी त्यांनी श्रीकृष्ण मंदिराच्या पायाभरणीत श्रद्धा भावनेने सढळ हस्ते मदत केली आहे. त्यांनी भावी पिढीला धर्माचरण करून यशस्वी जीवन जगण्याचा आदर्श घालून दिला. कर्त्यवकठोर व्यक्तिमत्वामुळे नानाजी महामंडळाच्या सर्व सदस्यांच्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्राथर्ना करत अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने नानाजी यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -