घरCORONA UPDATECoronavirus in Maharashtra: चिंताजनक परिस्थिती; रुग्णवाढिचे आजचे आकडे काळजी वाढविणारे

Coronavirus in Maharashtra: चिंताजनक परिस्थिती; रुग्णवाढिचे आजचे आकडे काळजी वाढविणारे

Subscribe

केंद्र सरकारने अनलॉक ४ ची घोषणा केली असून अनेक राज्यात रेल्वे, मेट्रो सेवा सुरु होत आहे. मात्र दुसऱ्या बाजुला महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. मागच्या २४ तासांत राज्यात १७ हजार ४३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची २४ तासातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ लाख २५ हजार ७३९ झाली आहे. राज्यात २ लाख १ हजार ७०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात २९२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २५ हजार १९५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.०५ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

 

राज्यात २९२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३४, ठाणे ६, नवी मुंबई ७, कल्याण डोंबिवली मनपा ४, पालघर ७, वसई विरार ८, रायगड १०, नाशिक २०, अहमदनगर ५, जळगाव १५, पुणे ३७, सोलापूर १३, सातारा ६, कोल्हापूर २०, सांगली १५, औरंगाबाद १, नागपूर ३८ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या २९२ मृत्यूंपैकी २०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू नागपूर १३,जळगाव ५, पुणे ४, ठाणे ३, अहमदनगर २, जालना २, कोल्हापूर २,पालघर २, नंदूरबार १, रायगड १ आणि नाशिक १ असे आहेत.

- Advertisement -

आज १३,९५९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,९८,४९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४२,८४,००० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८,२५,७३९ (१९.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,०४,२१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,७८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -