घरमहाराष्ट्रCoronavirus: राज्यात २४ तासांत १८९ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह; ४ जणांचा मृत्यू

Coronavirus: राज्यात २४ तासांत १८९ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह; ४ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाने आतापर्यंत २४५ पोलिसांचा घेतला बळी

दिवसेंदिवस कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. मागील २४ तासांत राज्यातील तब्बल १८९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २२ हजारांपार

राज्यात २४ तासांत १८९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २२ हजार ८१८ इतकी झाली आहे. यापैकी १९ हजार ३८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ हजार १८८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

राज्यात कोरोनाने आतापर्यंत २४५ पोलिसांचा घेतला बळी

राज्यात कोरोनाने आतापर्यंत २४५ पोलिसांचा बळी घेतला आहे. तर ३ हजार १८८ पोलीस सध्या उपचार घेत आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर पडणे, असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. हे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस प्रशासनाला या कोरोना विषाणूचा अधिक फटका बसत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

देशात बाधितांची संख्या ६० लाखांपार

सोमवारी कोविड -१९ च्या रूग्णांची संख्या ६० लाखांच्या पुढे गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात कोरोनाचे ८२ हजार १७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात व्हायरसमुळे १ हजार ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या ६० लाख १६ हजार ५२१ पर्यंत पोहोचली आहे. तर ५० लाख १६ हजार ५१२ लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत आणि रुग्णालयात उपचारानंतर घरी परतले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे ९५ हजार ५४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.


Covid-19: आज जारी होणार Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -