घरCORONA UPDATECovid-19: आज जारी होणार Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स!

Covid-19: आज जारी होणार Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स!

Subscribe

अनलॉक ५ मध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाऊ शकतात.

कोरोना महामारी दरम्यान लागू करण्यात आलेला लॉकडाउन वेगवेगळ्या टप्प्यात शिथील केला जात आहे. आतापर्यंत सरकारने ४ अनलॉकमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत आणि अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी प्रयत्नदेखील केला आहे. त्याअंतर्गत, अनलॉक ५ मध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाऊ शकतात. ऑक्टोबरपासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये सरकार आता कोणत्या सवलती देतात व कोणत्या गोष्टींवर बंदी घातली आहे.

मात्र गेल्या महिन्यात गृह मंत्रालयाने आणखी काही सूट देण्याविषयी सांगितले होते. आता हळूहळू कंटेनमेंट झोनबाहेरील ठिकाणी सूट दिली. आता, सणासुदीच्या दिवसात काही उद्योगांना तेजी येऊ शकते, त्यानुसार आणखी सूट दिली जाऊ शकते. यापूर्वी अनलॉकमध्ये मॉल्स, सलून, रेस्टॉरंट्स, जिम यासारखी सार्वजनिक ठिकाणं उघडण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र सिनेमा हॉल, जलतरण तलाव, करमणूक उद्याने अद्याप उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना ऑक्टोबरपासून उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे की नाही ये स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

१ ऑक्टोबरपासून थिएटर्स उघडण्यास परवानगी!

दरम्यान, पश्चिम बंगालने १ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी आधीच मर्यादित संख्येने घेतली आहे. तर सिनेमागृह उघडण्याची मागणी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाला बर्‍याच वेळा केली आहे. गेल्या महिन्यात माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला थिएटरमध्ये लोकांना बसवण्याचा एक मार्ग सुचवला होता. त्यानुसार, एका लाइनमध्ये एक जागा सोडून दुसरी व्यक्ती असे बसवले जाणार होते. गेल्या आठवड्यात एका रिपोर्टमध्ये असा दावाही केला गेला होता की कठोर नियमांमुळे गृह मंत्रालयाने १ ऑक्टोबरपासून थिएटर्स उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र पीआयबीने आपल्या एका फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते.

१० ऑक्टोबरपासून पर्यटन सेवा सुरू करण्याचा निर्णय

लॉकडाऊन दरम्यान पर्यटन क्षेत्राला चांगलाच फटका बसला आहे. अशा परिस्थितीत अनलॉक ५ च्या प्रक्रियेदरम्यान पर्यटकांसाठी अधिक पर्यटन स्थळे व पर्यटन केंद्रे सुरू करता येतील. अशाच एका प्रयत्नात सिक्किम सरकारने १० ऑक्टोबरपासून हॉटेल्स, होम स्टे आणि इतर पर्यटन संबंधित सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


देशात बाधितांची संख्या ६० लाखांपार; आतापर्यंत ९५,५४२ कोरोनाचे बळी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -