घरमहाराष्ट्रH3N2 चा धोका वाढला, राज्यात दोघांचा मृत्यू, तर देशात चार बळी

H3N2 चा धोका वाढला, राज्यात दोघांचा मृत्यू, तर देशात चार बळी

Subscribe

मुंबई – जगभरात कोरोनाचा धोका कमी झालेला असला तरीही इतर अनेक विषाणू डोके वर काढत आहेत. कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या H3N2 इन्फ्लूएंजाची रुग्ण महाराष्ट्रात वाढत असून राज्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिला मृत्यू अहमदनरमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय डॉक्टर विद्यार्थ्याचा झाला असून दुसरा मृत्यू नागपुरात झाला आहे. (2 died in state due to h3n2 influenza)

देशात H3N2 इन्फ्लूएंजाचा विळखा वाढतोय. राज्यातही या रोगाची साथ पसरली असून सर्दी आणि खोकल्यामुळे अनेकजण हैराण आहेत. या विषाणूची लक्षणेही कोरोनासारखी असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एमबीबीएसचं शिक्षण घेणारा एक विद्यार्थी बाहेर फिरायला गेला होता. तिथून आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. तसंच, तो H3N2 बाधित असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात ७५ वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात H3N2मुळे आतापर्यंत २ मृत्यू झाले असून संपूर्ण देशभरात या विषाणूमुळे चारजणांचा जीव गेला आहे.

- Advertisement -

एकट्या पुण्यात २२ रुग्ण

कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच H3N2चे रुग्ण वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विषाणूनचे एकट्या पुण्यात २२ रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. १९ ते ६० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणून संस्थेने दिला आहे.

- Advertisement -

राज्यभर तापाची साथ

सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका जनसामान्यांवर बसत आहे. तसंच, हवेची गुणवत्ता पातळी ढासाळत असल्याने प्रदुषणातही वाढ झाली आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकलासारखे आजार डोके वर काढत आहेत. राज्यातील अनेक दवाखाने आणि रुग्णालये साथीच्या आजाराच्या रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. त्यातच, H3N2 चा प्रसार वाढल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरावा, सॅनिटायजरचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे. तसंच, सोशल डिस्टन्सिंगसारखे कोरोना प्रतिबंधक उपयांचा अवलंब केल्यास H3N2चा प्रसार रोखता येईल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -