घरमहाराष्ट्रकेस कापायला २०० तर दाढीला १०० रुपये!

केस कापायला २०० तर दाढीला १०० रुपये!

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात वाढलेले केस, दाढी यापासून अनलॉक काळातही सुटका होण्याची शक्यता कमी आहे. कारण सलूनमध्ये केस कापण्याच्या दरात मोठी वाढ होणार आहे. केस कापण्यासाठी २०० रुपये तर दाढीसाठी १०० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. सलून व्यावसायिकांकडून तसा निर्णय अगोदरच घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी खुर्च्या कमी करुन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवणे, मास्क सॅनिटायजरचा वापर करणे, पीपीई किटचा वापर करणे, अशा प्रकारचा खर्च वाढणार आहे. तर काही ठिकाणी काम करणारे लोक सुद्धा कमी करावे लागणार आहेत. त्यामुळेच ही दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सलून व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

लॉकडाऊननंतर सलून, ब्युटी पार्लरला शिथिलता मिळाल्यास खबरदारीचे उपाय अधिकाधिक करावे लागणार असल्याने ही दरवाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे सलून व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. खबरदारीचे उपाय करुन सलून सुरु करण्याची तयारी व्यवसायिकांनी दाखवल्यानंतर खबरदारी घेताना ज्या उपाययोजना करायच्या आहेत, त्यासाठी सर्व गोष्टींचा पुर्णपणे विचार करुन, सलून सुरु होण्यापूर्वीच या दरात २० ते ४० टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे.

सलून सुरु झाल्यास गर्दी होऊ नये यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करुन सलून सुरु होण्यापूर्वी नियमावली आणि वाढीव दर ठरवल्याने आता फक्त सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी हे सलून व्यावसायिक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -