घरमहाराष्ट्रराज्यात २०३३ नवे रुग्ण एकूण रुग्ण संख्या -३५,०५८

राज्यात २०३३ नवे रुग्ण एकूण रुग्ण संख्या -३५,०५८

Subscribe

५१ करोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तर ५१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२४९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७४९ रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ८४३७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने दिवसाला दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सलग दोन दिवस राज्यात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने सरकारच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तसेच ५१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मुंबईमध्ये २३, नवी मुंबई ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद २, अहमदनगर २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे. मृतांमध्ये ३५ पुरुष तर १६ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

- Advertisement -

तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,८२,१९४ नमुन्यांपैकी २,४७,१०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३५,०५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -