घरताज्या घडामोडी२२४ नवे रूग्ण : शहरातील रूग्णसंख्येत वाढ

२२४ नवे रूग्ण : शहरातील रूग्णसंख्येत वाढ

Subscribe

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२७) दिवसभरात 224 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 64, नाशिक शहर 12१, मालेगाव ३१, जिल्ह्याबाहेरील 4 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमध्ये प्रत्येकी एका रूग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ३ हजार 717 करोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात १ हजार ८१७ रूग्ण आहेत. जिल्ह्यात आजवर 2 हजार 3 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 398, नाशिक शहर 740, मालेगाव 793, आणि जिल्ह्याबाहेरील 7२ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ७१७ बाधित रूग्ण असले तरी प्रत्यक्षात १ हजार ४९९ रूग्णांवर उपचार सुरू आहे. यात नाशिक ग्रामीण ३२३, नाशिक शहर 9८5, मालेगाव 1५1, जिल्ह्याबाहेरील 40 रूग्ण आहेत. या रूग्णांवर जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. जिल्हा रूग्णालय 6६, नाशिक महापालिका रूग्णालये 985, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 97, मालेगाव रूग्णालय 6४, नाशिक ग्रामीण रूग्णालय 174 आणि गृह विलगीकरण 114 रूग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात 630 संशयित रूग्ण उपचारार्थ रूग्णालयांमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय १५, नाशिक महापालिका रूग्णालय ४6३, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 6, मालेगाव रूग्णालय १७, नाशिक ग्रामीण रूग्णालय 88 आणि गृह विलगीकरण ४१ रूग्ण आहेत.

- Advertisement -

शहरातील ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिक शहरात आजवर ९२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी शहरात एका ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. फुले मार्केटसमोर, पंचवटी येथील ७७ वर्षीय महिला २२ जून रोजी उपचारार्थ रूग्णालयात दाखल झाली होती. त्यांचा शुक्रवारी (दि.२६) मृत्यू झाला.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-३717 (मृत-२१5)
नाशिक ग्रामीण-7६0 (मृत-३9)
नाशिक शहर-१817 (मृत-९2)
मालेगाव शहर-1017 (मृत-७३)
जिल्ह्याबाहेरील-१23 (मृत-१1)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -