घरमहाराष्ट्रराज्यातील करोनाबाधित २५ हजार पार

राज्यातील करोनाबाधित २५ हजार पार

Subscribe

१४९५ नवे रुग्ण तर ५४ जणांचा मृत्यू

राज्यात बुधवारी १४९५ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णाची संख्या २५ हजार पार गेली आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. तर ५४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९७५ इतकी झाली आहे.

राज्यात ५४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुंबईमधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २ , सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. मृतांमध्ये ३३ पुरुष तर २१ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. बुधवारी ४२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ५५४७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,३०,८५७ नमुन्यांपैकी २,०३,४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २५,९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १४३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३,८०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५७.६५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात २,९८,२१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४,६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -