Pune Crime : आई-वडिलांसह मुलाकडून आत्महत्येचा प्रयत्न, ‘या’ कारणासाठी उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आई-वडिलांसह मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आजाराला कंटाळून या तिघांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या आजारात वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मायलेकावर उपचार सुरू आहेत. मुलाला फिट येत असल्यामुळे आणि आईला कर्करोगाने ग्रासल्यामुळे, या त्रासाला कंटाळून तिघांनीही विषप्राशन केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (७०) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (६०) आणि मुलगा चेतन सूर्यप्रकाश अबनावे (४१) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

काल सोमवारी संध्याकाळी तिघांनी हडपसर येथील राहत्या घरी जेवणातून विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अबनावे कुटुंब गेल्या १० ते १२ वर्षांपासून फुरसुंगी येथे राहत आहेत. सूर्यप्रकाश हे एका फोटोग्राफरकडे कामाला होते. ते निवृत्त झाले असून त्यांना उत्पन्नाचे काही साधन नाही. पण त्यांच्या पत्नीला कन्सर झाला असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.

मुलगा चेतन याची नोकरी गेली असून त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. हे संपूर्ण कुटुंब आर्थिक आणि आजारपणामुळे नैराशयात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे.


हेही वाचा : मी पुढची निवडणूक… पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत शरद पवारांनी दिलं