घरठाणेअंबरनाथ गोळीबार प्रकरणी 32 जणांवर मोक्का

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी 32 जणांवर मोक्का

Subscribe

दहा जणांना अटक

बैल गाड्यांच्या स्पर्धेतून अंबरनाथ मध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी पंढरी शेठ फडके समवेत 32 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 13 नोव्हेंबर रोजी अंबरनाथ मधील सुदामा हॉटेल जवळ बैल गाड्यांच्या शर्यतीतुन पंढरी शेठ फडके आणि कल्याण चे राहुल पाटील यांच्यातील वाद उफाळून आला दोन्ही गटाच्या वतीने गोळीबार करण्यात आल्याने परिसरात दहशती वातावरण निर्माण झाले होते.

शिवाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी फडके गटाच्या 32 जणांवर गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी आता पर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली असून 22 जणांनाच पोलीस शोध घेत आहेत. यात महत्वाचे म्हणजे कल्याण चे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी सर्व 32 जणांवर मोक्का लावून गुन्हेगारांचे कम्बरडे मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणी पोलीसांनी राजकीय दबावाखाली निरपराध लोकांना मोक्का लावून नाहक अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फडके गटाच्या नातेवाईकांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -