पंढरपूर श्री विठ्ठल आश्रमातील 40 भाविकांना जेवणातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

हे सर्व भाविक श्री विठ्ठल आश्रमात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होते. यात स्थानिक आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील भाविकांचा समावेश आहे

40 people food poisoning shree vitthal ashram in pandharpur

पंढरपूरच्या श्री विठ्ठल आश्रमातील 40 भाविकांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची माहिती आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले आहे. जवळपास 100 भाविकांनी हे जेवण खाल्लं असून त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

श्री विठ्ठल आश्रमात दुपारच्या जेवणात बासुंदी, पत्ता कोबी, बेसन, चपाती, भजे या समावेश होता. दरम्यान हे जेवण जेवणाऱ्या 40 भाविकांना संध्याकाळी अचानक उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. यावेळी त्यांना तात्काळ उपचारांसाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यातील दहा ते पंधरा भाविकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर इतर जनरल विभागात उपचार घेत आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मात्र पंढरपूर सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता उपजिल्हा डॉक्टर अरविंद गिराम, वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

हे सर्व भाविक श्री विठ्ठल आश्रमात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होते. यात स्थानिक आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील भाविकांचा समावेश आहे. दरम्यान विषबाधा झालेल्यांमध्ये गोरख जयभद्र, विनायक नाडे, वैभव कुंभार, आदिनाथ मालकर, केशव पवार, अभिजीत शिंदे, लक्ष्मण फुके, ऋषिकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषिकेश तांबे, अर्जुन पवार, गणेश राहणे, प्रताप गीते, प्रदीप विठ्ठल शिरोळे, सुदर्शन सगळे, ओंकार निर्मले, प्रणव शिंदे, पवन सुलतानी, दर्शन जाधव, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक मोरे, करण परदेशी, स्वागत गाजरे, हरिशचंद्र लोखंडे, अतुल सुरवसे, वैभव शेटे, माऊली गवाड यांचा समावेश आहे.

पळसगाव, निमगाव, हळेगाव, वैजापूर, तळोशी, ढाणगाव दौंड, परभणी, कोल्हापूर , शेळवे पंढरपूर, पाटणे , जालना , सिंदखेड , सावरखेड , नाशिक, ढवळगाव , कोपरगाव , जालना, पैठण, दौंड अशा सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे भाविक इथे राहत होते.


सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना