राज्यसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता 41 मतांची गरज, ‘या’ कारणामुळे बदलला मतांचा कोटा

41 votes required to win Rajya Sabha elections
राज्यसभा (प्रातिनिधिक छायाचित्र)

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठीचा मतांचा कोटा कमी करण्यात आला आहे. हा कोटा आता 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14  होता. आताच्या सुधारी कोट्या नुसार उमेदवाराला विजयासाठी 41 मतांची गरज आहे. तर याआधी उमेदवाराला निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज होती.

राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे हा कोटा बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम सारखे लहान पक्ष महाविकास आघाडीकडे झुकले असल्याने महाविकास आघाडीसाठी हा बदललेला कोटा फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.

उच्च न्यायालयात आपील –
शुक्रवारी होणाऱ्या राज्यसभेच्या निवणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर आपण उच्च न्यायालयात आपील करणार असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस –
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस पहायला मिळत आहे. 10 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे.