घरमहाराष्ट्रराज्यात ४,९८१ नवे रुग्ण, ७५ जणांचा मृत्यू

राज्यात ४,९८१ नवे रुग्ण, ७५ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४७,९०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे.

राज्यात ४,९८१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८,६४,३४८ झाली आहे. राज्यात ७३,१६६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४७,९०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे.

राज्यात आज ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १५, नाशिक ३, पुणे ४, सोलापूर ३, सातारा ७, सांगली ५, बीड ३, नागपूर ८, चंद्रपूर ५ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. आज ५,१११ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण १७,४२,१९१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४५ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१४,४७,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,६४,३४८ (१६.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४३,०९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,१०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -