घरमहाराष्ट्रकाळाचा घाला, ढोल - ताशांचा नाद घुमलाच नाही!

काळाचा घाला, ढोल – ताशांचा नाद घुमलाच नाही!

Subscribe

सिंदखेडराजा येथे ढोल पथकांच्या झालेल्या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढोल पथकातील वादक हे मुळचे वाशिमचे रहिवाशी आहेत.

राज्यभरात बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय. मात्र सिंधखेडराजा येथे ढोलपथकावरच काळाना घाला घातला. विसर्जन मिरवणुकीमध्ये वाजवण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातामध्ये ढोल पथकातील ५ जण ठार झाले आहेत. बुलडाण्यातील लोणार येथे शनिवारी रात्री जीप आणि लक्झरीमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ढोलपथकातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. पाचही जण मुळचे वासिमचे रहिवासी आहेत.

ढोल – तांशाच गजर झालाच नाही

वाशिम येथील भरजहागीर येथून १० ते १२ जण शनिवारी रात्री सिंदखेडराजाकडे बोलेरो गाडीने निघाले होते. त्यानंतर ढोल पथकाची गाडी लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ पोहोचल्यानंतर त्यांच्यावर काळानं घाला घातला. यामध्ये बोलेरो गाडीतील अरुण संजय कांबळे (२२), राजू भगवान कांबळे (२५), ज्ञानेश्वर वामन डोंगरे (२०) सह आणखी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बीबी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -