घरCORONA UPDATEना मिळाला ऑक्सिजन, ना बेड, प्रवाशी निवाऱ्यात रूग्णाचा रात्रभर तडफडून मृत्यू

ना मिळाला ऑक्सिजन, ना बेड, प्रवाशी निवाऱ्यात रूग्णाचा रात्रभर तडफडून मृत्यू

Subscribe

येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी बेड, ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने वेळीच योग्य उपचार होऊ शकले नाही.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. ब्रह्मपुरीच्या ख्रिस्तानंद रुग्णालयालगतच्या प्रवाशी निवाऱ्यात एका रुग्णाचा उपचाराविना तडफडून मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. दरम्यान बाजूलाच रुग्णालय असूनही वेळीच उपचार न मिळाल्याने या रुग्णाचा रविवारी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला.

५० वर्षाीय मृत रुग्ण कुही तालुक्यातील आंबोरा येथे वास्तव्यास होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती स्थिर नसल्याने डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यावेळी मृत रुग्णाची पत्नी त्याला खासगी वाहनाने बह्मपुरीला घेऊन आली. मात्र येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी बेड, ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने वेळीच योग्य उपचार होऊ शकले नाही. यावेळी पत्नी आणि नातेवाईकांनाही रुग्णाला बेड, ऑक्सिजन मिळावे म्हणून अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या घातल्या मात्र काही उपयोग झाला नाही.

- Advertisement -

अखेर आरोग्य यंत्रणेसमोर हताश, हतबल झालेल्या पत्नीने ख्रिस्तानंद चौकातील प्रवाशी निवाऱ्यात गंभीर अवस्थेत असलेल्या पतीला घेऊन राहिली. तिथेच त्यांनी रात्री घालवली. यावेळी पत्नीने सकाळी तरी रुग्णालयात जागा उपलब्ध होईल या आशेने प्रवाशी निवाऱ्यात रात्र चिंतेत घालवली, परंतु रविवारी सकाळीचं रुग्णाचा उपचाराविना मृत्यू झाला. यामुळे ना ऑक्सिजन, ना बेड वेळेवर उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव दगावला.

प्रशासनाला याबाबतची माहिती मिळताच सर्व यंत्रणेणे घटनास्थळी धाव घेतली. या रुग्णाचे अहवाल पाहता त्यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे होती. अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असतानाही कोणत्याही रुग्णालयाने त्याला भर्ती करून देण्यास तयारी दर्शवली नाही त्यामुळे हा यंत्रणेचा बळी ठरला आहे. या भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असतानाही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही पाऊले उचलली जात नसल्याचा आरोप चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -