घरमहाराष्ट्र'घे डबल' म्हणाऱ्यांनो सावधान!

‘घे डबल’ म्हणाऱ्यांनो सावधान!

Subscribe

धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने महाराष्ट्रात दरवर्षी ७२ हजार लोकांचा बळी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दररोज केवळ धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या आजारांमुळे महाराष्ट्रात दरवर्षी ७२ हजार लोकांचा बळी जातो. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंतेची बाब आहे. पण, हे मृत्यू पोलीस, शिक्षण आणि आरोग्य विभागाने तंबाखू विरोधी कोटपा -२००३ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास रोखणे शक्य होणार आहे. त्याकरिता शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ‘प्लेज फॉर लाईफ’ हे अभियान हाती घेण्यात आलं असून त्याची सुरूवात गुरुवारी पुण्यात झाली. संबंध हेल्थ फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, केअरिंग फ्रेंड्स, व्हीओटीव्ही तर्फे पुण्यात एका खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

२६ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

राज्यातील जवळपास २६ लाख विद्यार्थी या तंबाखू विरोधी मोहिमेत सहभागी झाले आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. त्यात विद्यार्थाना तंबाखू विरोधी माहितीपट दाखवून जागृत केले जाणार असून यासोबत तंबाखू विरोधी सामूहिक शपथ घेत आपली शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.

- Advertisement -

५३० मुले तंबाखूच्या आहारी

ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ ( गेट्स ) नुसार, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जवळपास ( २.४) अडीज कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यात २ कोटी लोक तोंडावाटे तंबाखू सेवन करणारे तर ४० लाख धूम्रपान करणारे आहेत. त्यांच्या व्यसनाचा परिणाम व्यसनकर्त्याप्रमाणे निर्व्यसनी लोकांच्या आरोग्यावर होत आहे. केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे महाराष्ट्रीतल ४५ हजार लोकांचा मृत्यू होतो. शाळेत जाणाऱ्या आठवी, नववी आणि दहावीच्या एकूण ४ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असते. त्याही पेक्षा गंभीरबाब म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची सुरुवात करत असल्याचे सर्वेक्षण सांगते.

राज्यातील शालेय संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग २०१५ पासून कार्यरत आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ‘प्लेज फॉर लाईफ’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थी युवकांचे तंबाखू विरोधी अभियान उभारले जाणार आहे.  – दिपक छिब्बा, महाराष्ट्र प्रमुख संबंध हेल्थ फाऊंडेशन

- Advertisement -

मुलांना तंबाखू विरोधी चळवळीच्या माध्यमातून विविध उपक्रमांची आखणी करत तंबाखू सिगारेट सेवनाच्या सवयीपासून रोखणे शक्य होऊ शकते. भारतात केवळ तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर १ लाख ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च होत आहेत.  – डॉ. अंकित शाह, रूबी हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -