घरताज्या घडामोडीराज्यात 781 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 4 रुग्णांचा मृत्यू

राज्यात 781 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 4 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात 781 इतक्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 1 हजार 523 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,42, 981 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.05 टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण 9 हजार 887 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत 3 हजार 691 इतके रुग्ण असून ठाण्यामध्ये 2 हजार 338 सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

देशात मागील 24 तासांत 7 हजार 946 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल बुधवारी देशात 7231 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. परंतु आजच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. देशात ही संख्या 64 हजार 667 वर पोहोचली होती.


हेही वाचा : महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी, महेश तपासेंची मागणी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -