घरमहाराष्ट्रनाशिकजायखेड्यातील ३० रिपोर्ट निगेटिव्ह; एक बाधित

जायखेड्यातील ३० रिपोर्ट निगेटिव्ह; एक बाधित

Subscribe

बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फात सर्वेक्षण करून घेतली जातेय नोंद

प्रकाश शेवाळे : जायखेडा

बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून आला आहेत तर घरातच बसा. बाहेर निघायचे नाही, अशा सूचना करीत मागील १० ते १२ दिवसांपासून आरोग्य विभागाकडून तब्बल शेकडो नागरिकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच अजमेर सौंदाणे येथील क्वांरटाईन सेंटरला नवीन ३१ संशयित रुग्ण पाठवण्यात आले असता पैकी १ रुग्ण करोनाबाधित आढळून आला. तर ३० रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अखेरच्या टप्प्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जायखेडासह परिसरातील गावांची चिंता काहीशी कमी झाली आहे.
बागलाण तालुक्यातील मोसम खोर्‍यातील जायखेडा येथील करोनाबाधित मृत वाहनचालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कातील जायखेडासह मुल्हेर, आमोदे, मुंजवाड, ताहराबाद, सोमपूर, वाडीपिसोळ, जयपूर, नांदीन अशी साखळी तयार होऊन या गावांतील आजपर्यंत ५२ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असताना, या बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचे घेतलेले स्ॅब त्यानंतर प्राप्त अहवालानुसार सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने या गावांतील नागरिकांमधील चिंतेचे सावट दूर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर बाधित रुग्णांवर अजमेर सौंदाणे येथील क्वांरटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहेत. आपल्या गावात करोना येऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच जायखेडा ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, आशाताई, अंगणवाडी सेविका, आदींनी प्रयत्न केलेले आहेत. आजही सर्व घटकांचे प्रामाणिकपणे आपापले काम सुरु आहे. बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून एखादी व्यक्ती आली की त्याची आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत नोंद घेतली. त्यांना होम क्वारंटाईन केले.
–-
बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फात सर्वेक्षण करून नोंद घेतली जात आहे. प्रत्येकाला होम अथवा संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. आता परिस्थिती आटोक्यात येत आहे. आरोग्य केंद्राच्या पथकांमार्फत त्यांच्या संपर्कात असतो. त्यांना सूचना करून घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाते.
– शांताराम अहिरे, सरपंच, ग्रामपंचायत जायखेडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -