घरताज्या घडामोडीनागरिकांच्या सुरक्षेसाठी 'एनडीआरएफ'च्या ९, तर 'एसडीआरएफ'च्या ४ टीम सज्ज

नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘एनडीआरएफ’च्या ९, तर ‘एसडीआरएफ’च्या ४ टीम सज्ज

Subscribe

मंगळवारी दिवसभर राज्यभरात पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुरस्थितीत नागरिकांचे हाल होऊ नये, त्यांना योग्यवेळी मदत मिळावी, यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी दिवसभर राज्यभरात पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुरस्थितीत नागरिकांचे हाल होऊ नये, त्यांना योग्यवेळी मदत मिळावी, यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (9 teams of ndrf and 4 teams of sdrf total 13 team ready for safety of maharashtra people in rain)

कोकणासह काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत.

- Advertisement -

शिवाय, गरजेच्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असून, हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासात मुंबईतील कुलाबा येथे ११७ मिमी तर सांताक्रूझ येथे १२४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २ नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून, जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.

- Advertisement -

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. मुंबई आणि राज्यातील इतर शहरात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असल्याने तातडीने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व विभाग अलर्ट असून समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. सगळ्यांनी आपआपली तयारी काय काय आहे, हे बैठकीत सांगितली आहे. याशिवाय ज्या काही इजन्सी आहेत त्यांच्या टीम देखील वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज ठेवल्या आहेत.

अतिवृष्टी झाल्यास नागरिकांचे नुकसान होणार नाही. दरड कोसळून दुर्घटनेची ठिकाणं ट्रॅक केली आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासह, काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.


हेही वाचा – मुंबईला पावसाने झोडपले ; विक्रोळीत घरावर झाड कोसळले, रेल्वे रुळांवर साचले पाणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -