घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023शेतकऱ्याला २ रुपये चेक, सूर्या ट्रेडर्चा परवाना रद्द; उपमुख्यंत्री फडणवीसांची घोषणा

शेतकऱ्याला २ रुपये चेक, सूर्या ट्रेडर्चा परवाना रद्द; उपमुख्यंत्री फडणवीसांची घोषणा

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील राजेंद्र चव्हाण यांना ५१२ किलो कांद्याला एक रुपया प्रति किलो इतका भाव मिळाला. वाहतूक आणि अन्य खर्च गेल्यानंतर चव्हाण यांच्या हातात अवघे अडीच रुपये उरले.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील राजेंद्र चव्हाण यांना ५१२ किलो कांद्याला एक रुपया प्रति किलो इतका भाव मिळाला. वाहतूक आणि अन्य खर्च गेल्यानंतर चव्हाण यांच्या हातात अवघे अडीच रुपये उरले. याप्रकरणी संबंधीत सूर्या ट्रेडर्स याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (A check of Rs 5 to the farmer cancellation of Surya Trade license Deputy Chief Devendra Fadnavis announcement)

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे चहापान आयोजित करण्यात आला. या चहापानांतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संयक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राजेद्र चव्हाण यांनी ५१२ किलो कांद्यांची विक्री केली. मात्र त्यांना यातून केवळ २ रुपये मिळाले. कारण वाहतुकीचा खर्च वजा करण्यात आला. परंतु, २०१४च्या जीआरनुसार, कमी प्रतीच्या कांद्याच्या मालातून वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही. परंतु, राजेंद्र चव्हाय या शेतकऱ्याकडून तो वजा करण्यात आला. त्यामुळे २०१४च्या जीआरनुसार संबंधीत सूर्या ट्रेडर्स याचा परवाना रद्द करण्यात आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील राजेंद्र चव्हाण यांना ५१२ किलो कांद्याला एक रुपया प्रति किलो इतका भाव मिळाला. वाहतूक आणि अन्य खर्च गेल्यानंतर चव्हाण यांच्या हातात अवघे अडीच रुपये उरले. त्यामुळे राजेंद्र चव्हाणांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. याबाबत अजित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

सोलापूर मार्केट यार्डात, बार्शीचे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 17 फेब्रुवारीला, 512 किलो कांदा विकला. त्यांना किलोला १ रुपया दर देण्यात आला. ट्रान्सपोर्ट, हमाली, तोलाईचा खर्च वजा करुन व्यापाऱ्यानं,च्या 10 पोती कांद्याला, २ रुपयांचा चेक दिला. ही शेतकऱ्यांची स्थिती आहे. सिन्नर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं ४ क्विंटल कांदा विकल्यानंतरही त्याला १ रुपयाही मिळाला नाही. उलट खिशातून ३१८ रुपये द्यावे लागले.


हेही वाचा – 512 किलो कांद्याला मिळाले फक्त 2 रुपये; बार्शीतील शेतकऱ्याने अजित पवारांकडे मांडली कैफियत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -