Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकलचा टँकर उलटला, वाहतूक खोळंबली

ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकलचा टँकर उलटला, वाहतूक खोळंबली

Subscribe

टॉल्युएन केमिकल घेऊन जाणारा टँकर घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजखाली उलटल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी या मार्गावरील वाहतुकीवर चांगला परिमाण झाला होता. तीन तास वाहतूक कासव गतीने सुरू होती. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी साधारणपणे पहाटे चार वाजले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

जेएनपीटी येथून गुजरात सुरत येथे २५ टन वजन केमिकल टँकर घेऊन टँकर चालक महोम्मद साकिर हा घोडबंदर रोड मार्गे निघाला होता. पातलीपाडा ब्रिजजवल येतात चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर उलटून अपघात झाला.

- Advertisement -

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,चितळसर पोलीस, शहर वाहतूक पोलीस, एमएमआरडीए कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.

या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र हा अपघात झाल्याने घोडबंदर रोडवरील वाहतूक ३ तास धीम्या गतीने सुरू होती. तसेच उलटलेला टँकर क्रेनच्या सहाय्याने पहाटे चार वाजताच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर घोडबंदर रोडची वाहतूक सुरळीत सुरू झाली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.


- Advertisement -

हेही वाचा : पटोले महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’, प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा ; काँग्रेस नेत्यांची दिल्लीत


 

- Advertisment -