घरमहाराष्ट्रसाईबाबांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

साईबाबांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

मुंबई : बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री (Bageshwar baba) यांनी साईबाबाविरुद्ध केलेल्या टिप्पणीसाठी त्यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी दाखल केलेल्या तक्रारीत बागेश्वर बाबावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करताना एफआयआर नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हेही वाचा – सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये…; कारवाईबाबत संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र

- Advertisement -

बागेश्वर बाबा काय म्हणाले होते!
दरम्यान, मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये बागेश्वर बाबांच्या कथेचे आयोजन 25 मार्च ते 31 मार्च दरम्यान करण्यात आले होते. यावेळी त्यांनी साईबाबांबद्दल अनेक गोष्टी सांगिताना वक्तव्य केले की, माझे गुरु शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवाचा दर्जा दिला नाही. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान असल्याचे बागेश्वर बाबा यावेळी म्हणाले होते.
याशिवाय ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही, पण कोणी कोल्ह्याचे कातडं पांघरुन सिंह बनू शकत नाही, असे बागेश्वर बाबा म्हणाले होते. त्यांनी असेही सांगितले की, संत आपल्या धर्माचे असो किंवा तुलसीदास, सूरदासही असोत, हे लोक महान असू शकतात, ते योगपुरुष असू शकतात. पण कोणीही देव असू शकत नाही. बागेश्वर बाबाच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

संत तुकारामांबद्दलही वादग्रस्त विधान
याआधी बाहेश्वर बाबांनी संत तुकाराम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळं बागेश्वर बाबा यांनी उधळली होती. महाराष्ट्राचे एक महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का? त्यावेळी महाराज म्हणाले की, ही तर देवाची कृपा, ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारी बायको मिळाली असती तर मी देवाचा धावा केला नसता, असे देखील बागेश्वर म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -