घरमहाराष्ट्रमुंबईच्या सुशोभीकरणाचा दर पंधरवड्याला आढावा, पालिका आयुक्त चहल यांचा आदेश

मुंबईच्या सुशोभीकरणाचा दर पंधरवड्याला आढावा, पालिका आयुक्त चहल यांचा आदेश

Subscribe

मुंबई : मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत होत असलेल्या कामांच्या अंमलबजावणीचा विभाग कार्यालय स्तरावर दर आठवड्याला तर परिमंडळ स्तरावर दर पंधरवड्याला आढावा घ्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांनी आज दिले.

आयुक्त चहल यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासमवेत सर्व सहआयुक्त, परिमंडळांचे उपआयुक्त, संबंधित खात्यांचे सह आयुक्त / उपआयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित खाते प्रमुख यांची शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी विविध आदेश दिले.

- Advertisement -

सर्व 24 विभाग कार्यालय आणि संबंधित खात्यांच्या स्तरावर देखील दक्षता समिती नेमावी. या समित्यांनी प्रामुख्याने सुशोभीकरण अंतर्गत होणाऱ्या कामांची प्रगती व गुणवत्तेवर लक्ष ठेवावे. तसेच कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने त्याचे निराकरण करावे, असे आदेशही आयुक्त चहल यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन धोरणात बदल
सार्वजनिक प्रसाधनगृहांसाठी तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांसाठी ज्या परिसरांमध्ये जागा उपलब्ध करुन घेताना जे कोणी प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांचे योग्य पुनर्वसन होणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकल्प बधितांना पुनर्वसन करताना त्यांना योग्य जागा किंवा मोबदला देता यावा, यासाठी प्रचलित धोरणामध्ये योग्य तो बदल करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे आदेशही आयुक्त यांनी दिले आहेत.

- Advertisement -

प्रसाधनगृहे 24 तास स्वच्छ ठेवण्यासाठी धोरण
मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहेही 24 तास स्वच्छ ठेवण्यावर अधिक जोर देण्याचा फडणवीस व शिंदे सरकारचा मुंबई महापालिकेमार्फत मानस आहे. प्रसाधनगृहांची नियमित देखभाल, स्वच्छता होण्यासाठी पालिका युद्धपातळीवर एक महत्वपूर्ण धोरण तयार करीत आहे. त्यासाठी आवश्यक सांख्यिकी व माहिती संकलित करण्यात येत आहे. सर्व सार्वजनिक प्रसाधनगृहे 24 तास स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालिका प्रयत्नशील आहे. तसेच, ज्या वसाहती / परिसरांमध्ये आवश्यक आहे, तिथे नवीन प्रसाधनगृहे बांधण्याची कार्यवाही सुरू करावी. त्याचप्रमाणे खास व फक्त महिलांसाठी राखीव असलेली व त्यानुरुप सर्व सुविधा समाविष्ट असलेली किमान 200 प्रसाधनगृहे मुंबईत तयार करायची आहेत. त्यामुळे सर्व विभाग कार्यालयांनी आपल्या स्तरावरील आवश्यक संख्या निश्चित करावी, असे पालिका आयुक्त चहल यांनी फर्मावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -