घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभावी डॉक्टरवर माजी प्रियकराचा बलात्कार; जव्हारच्या जंगलात नेऊन केला अत्याचार

भावी डॉक्टरवर माजी प्रियकराचा बलात्कार; जव्हारच्या जंगलात नेऊन केला अत्याचार

Subscribe

नाशिक : शहरातून तरुणीचे अपहरण करून पालघर जिल्ह्यातील जव्हाऱ-पालघर रस्त्यावर जंगलात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शहरातील महामार्ग बसस्थानकातून बळजबरी दुचाकीवर बसवून नेत वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीवर तिच्याच माजी प्रियकराने बळजबरीने बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्यात तरुणीच्या माजी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, गुन्ह्याची सुरवात नाशिकमधून झाल्याने मुंबई नाका पोलीस ठाण्यातही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर येथील एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी आपल्या मित्रासोबत मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात पालघरला जाण्यासाठी बसची वाट बघत होती. त्याचवेळी तिचा माजी प्रियकर असलेला संशयित योगेश प्रकाश भुयाळ आला. सुरवातीला त्याने तरुणीला पालघरला जाण्यासाठी लिफ्ट देण्याचा बहाणा केला. परंतु, तरुणीने इन्कार केल्यानंतर त्याने तिला धमकावले. तरुणीच्या मित्रानेही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यालाही योगेशने धमकावले. त्यानंतर त६याने तरुणीला बळजबरी आपल्या दुचाकीवर बसवून पालघरच्या दिशेने घेऊन गेला.

- Advertisement -

पालघरच्या जव्हारच्या पुढे गेल्यानंतर संशयित योगेश प्रकाश भुयाळ याने जंगलात एका निर्जन दुचाकी थांबवली. त्यानंतर  तो तरुणीला बळजबरीने हाताला धरून ओढत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. त्याचवेळी तरुणीला त्याच्या इरादा लक्षात आला होता. परंतु, निर्जंनस्थळी तिने आरडाओरडा करूनही काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर संशयिताने तिच्याच ओढणीने तिचे हात पाय बांधून आणि तिच्या तोंडात बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. यावेळी दगडाने तिच्या डोक्याला मारल्यामुळे जखमही झाली.

तरुणी पालघर येथे घरी पोहचल्यानंतर तरुणीच्या डोक्याला झालेल्या जखमेवरुन तिच्यासोबत काहीतरी बरे वाईट झाल्याची कुणकुण कुटुंबियांना लागली. कुटुंबियांनी याबाबत तरुणीला विश्वासात घेत काय घडले आहे, जखम कशी झाली याबाबत विचारणा केली. सतत पाच दिवस तरुणीला विश्वास दिल्यानंतर अखेर तिने ओळखीतल्याच तरुणाने तिच्यावर अत्याचार केळ्याचे कुटुंबियांना सांगितले यानंतर खर्‍या अर्थाने घटनेचा उलघडा झाला. यानंतर तरुणीने कुटुंबियांच्या मदतीने पीडित तरुणीने पालघर जिल्ह्यातील मनोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याची सुरवात मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून झाल्याने हा गुन्हा टपालाने शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित योगेश प्रकाश भुयाळ याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -