घरताज्या घडामोडीराज्यात सर्व सामान्यांना न्याय देणारे सरकार कार्यरत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सर्व सामान्यांना न्याय देणारे सरकार कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्री मलंग गडाच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी हजेरी लावली. श्री मलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली.

ठाणे : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्री मलंग गडाच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी हजेरी लावली. श्री मलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉ बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (A government that gives justice to all the common people is working in the state says Chief Minister Eknath Shinde)

मलंग गडाच्या पायथ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी “शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी या मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही सुरू ठेवू. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले. सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आपल्या शुभेच्छांमुळे कार्यरत आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“मागील सहा महिन्यात सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात कोविडमुळे निर्बंध होते, सगळे बंद होते. मात्र आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सव मोठ्या जोमात साजरे करण्यात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे शिंदे म्हणाले.

“देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सहकार्याने विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत”, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – गाडीमध्ये घुसला पत्रा, पण आजी-आजोबा सुखरूप; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -