घरमहाराष्ट्रनाशिकरंगीबेरंगी पतंगांनी व्यापले आकाश; काटाकाटीचा रंगला खेळ

रंगीबेरंगी पतंगांनी व्यापले आकाश; काटाकाटीचा रंगला खेळ

Subscribe

नाशिक : टेरेसवर लावलेल्या हिंदी-मराठी गाण्यांचा ताल, भान हरपून चाललेली पतंगबाजी आणि पतंगांची काटाकाटी.. अशा जल्लोषात नाशिककरांनी रविवारी (दि.१५) मकरसंक्रांतीचा सण साजरा केला. तिळगुळाची देवाण-घेवाण करत हा सण गोड झाला.

नववर्षाच्या प्रारंभीच आलेल्या मकरसंक्रांतीचा सण नाशिककरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. भोगी, संक्रांत आणि कर या तीनही दिवशी पतंगोत्सव साजरा केला जातो. याच्या दुसर्‍या दिवशी अर्थात रविवारी (दि.१५) सुटीचा दिवस असल्याने पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. दिवसभर शहरातील प्रत्येक इमारतीच्या गच्ची व घरांच्या धाब्यांवर पतंगप्रेमींचा जल्लोष सुरू होता. आकाशात असंख्य पतंग घिरट्या घालत होते. हवेतील वार्‍यासोबत आकाशात विहरणार्‍या पतंगांच्या काटाकाटीलाही उधाण आले होते. त्यामुळे काटाकाटीचा हा ‘पेच’ सायंकाळपर्यंत रंगला होता. पतंगबाजीतील या पतंग कापाकापीत कुणी याचा, तर कुणी त्याचा पतंग काटल्यावर होणारा ‘वकाट…वकाटे’चा जिंकल्यागतचा जल्लोषदेखील लक्ष वेधून घेत होता. पतंग उडवण्यासाठी सकाळपासूनच शहरात घराघरांच्या गच्चींवर तरुणांनी गर्दी केलेली दिसून आली. त्यामुळे रंगीबेरंगी पतंगांनी आकाशच व्यापून गेले होते.

- Advertisement -

डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च, जीएसटीमुळे कच्चामाल वाढल्याने तसेच कागद, बांबू, दोरा आदींचे दर वाढ झाल्याने आसारी व पतंगाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली असली तरी पतंगप्रेमींवर मात्र कुठलाही परिणाम झालेला दिसून आला नाही.

काटाकाटीचा रंगला खेळ

इमारतीच्या गच्चीवर डिजेच्या तालावर नाचत, मित्रमंडळी, पाहुण्यांच्या उपस्थितीत अनेकांनी आपल्या परिवारासह पतंगोत्सवाचा आनंद घेतला. पतंगांची अवकाशात गवसणी घालतानाच काटाकाटीचा खेळही रंगला होता. दोर कापल्यानंतर वका… ट…’, कटी रे…’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -