Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा संजय शिरसाटांचा ट्रॅक्टर चोरीला; सातारा पोलिसांत तक्रार दाखल

संजय शिरसाटांचा ट्रॅक्टर चोरीला; सातारा पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

मुंबई | राज्यात राजकीय नेते मंडळींच्या घरी चोरी (Thief) झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या घरी चोरीच्या घटना आपण ऐकल्या आहेत. यात आता राजकीय नेते मंडळी देखील अपवाद राहिलेले नाही. शिंदे गटाच्या बड्या नेत्यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्या मालकीचा पाच लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर (Tractor) चोरट्यांने केल्याची घटना घडली आहे.

सिद्धांत शिरसाट यांचा ट्रॅक्टर ३ मे रोजी सायंकाळी सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे उभा करून ठेवला होता. हा ट्रॅक्टर चोरीला घेल्याची घटना दुसऱ्या दिवशी ४ मे रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. यानंतर सिद्धांत शिरसाट यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. सिद्धांत शिरसाट यांनी चोरीला गेलेला ट्रॅक्टर पाच लाख रुपये किंमतीला विकत घेतला होता. एम. एच २८ एफ. यु ८९२६ असा ट्रॅक्टरचा नंबर आहे, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराच्या घरी चोरी  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली होती. संभाजीनंगर शहरातील एन-३ मधील चाऊस कॉलनीमध्ये फौजिया खान यांचे घर आहे. चोरट्यांनी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात चोरी केली होती. चोरांनी रात्रीच्या सुमारास फौजिया खान यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडून प्रवेश केला होता. यानंतर चोरांनी फौजिया खान यांच्या घरातील जर्मनचे पाच जुने भांडे चोरेल आणि त्यांची किंमत ३ हजार रुपये होती. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -