घरCORONA UPDATELockdown : मुंबई आणि पुण्यात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता!

Lockdown : मुंबई आणि पुण्यात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता!

Subscribe

लॉक डाऊन १५ एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोन्ही शहरातील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे पाहता आणखीन दोन आठवडे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीत दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पहिला प्रस्ताव म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकांना अनुदानित अन्न धान्य पुरवलं जाईल. तर शिवभोजन थाळी योजना पुढील तीन महिने तालुका स्तरावर कायम राहील, असा दुसरा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरून लॉक डाऊन १५ एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ वर उपस्थित होते. तर काही जण मंत्रालय आणि इतर आपापल्या मतदारसंघातून बैठकीला हजर होते.

मुंबई व पुण्यातील लॉकडाऊन कायम ठेवा

मंत्रिमंडळ बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे एका मंत्र्याने सांगितले. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील लॉकडाऊन तूर्तास कायम राहायला हवा, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी आहे. तिथे लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत, असे अनेकांचे मत आहे. नियम जरी शिथिल केले तरी जिल्हा बंदी कायम राहायला हवी, असे सर्वांचे मत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता येत्या काही दिवसात निर्णय घेतला जाईल, असे या मंत्र्याने सांगितले.

- Advertisement -

लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या आधारावर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल, याबाबत मंत्री मंडळात चर्चा झाली. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या दोन शहरातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढविण्याची शक्यता आहे.

१० एप्रिल रोजी आढावा

१० एप्रिल रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि १४ एप्रिल रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊन उठविण्यासंदर्भातील निर्णय योग्यवेळीच घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -