घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्विमिंग पूलमध्ये उतरताच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये उतरताच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

Subscribe

नाशिक : मालेगावात स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे वय अवघे 19 वर्षे आहे. मृतक कुटुंबाचे जयेश भावसार असे नाव आहे. या घटनेमुळे भावसार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सध्या हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, जॉगिंग करताना काहींचा मृत्यू झाला आहे. मालेगावात स्विमिंग पुलात पोहताना हृदय विकाराच्या धक्क्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मालेगावात घडली. जयेश भावसार असे या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

मालेगाव शहरातील शिवाजी नगर भागात अस्पायर क्लबचे स्विमिंग पूल आहे. जयेश नेहमीप्रमाणे या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. जयेशने स्विमिंग पुलात उडी मारल्यानंतर तो पोहत असताना त्याला त्रास जाणवला आणि तो स्विमिंग पुलातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्रास वाढल्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. उपस्थित नागरिकरांनी त्याला पाण्याबाहेर काढून तोंडाने श्वास दिल्यानंतर एकदा जयेश उठला. मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -