Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र परदेशात अ‍ॅडमिशनचे आमिषाने तरुणीची ४ लाखांची तर वृद्धाची थायलंडच्या पॅकेजमध्ये फसवणूक

परदेशात अ‍ॅडमिशनचे आमिषाने तरुणीची ४ लाखांची तर वृद्धाची थायलंडच्या पॅकेजमध्ये फसवणूक

Subscribe

नाशिक : परदेशात शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन करून देण्याचे आमिष दाखवत गुजरातमधील चार जणांनी नाशिकमधील एका २६ वर्षीय तरुणीला ३ लाख ९८ हजार ४४३ रुपयांना गंडविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मिरा नलीन पटेल यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित हार्दिक गांगोडे (रा. बडोदा), राजन मोहनलाल नंदवाणी (रा. सूरत), चिंतन कुमार शिंगाला, प्रियंका शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चार जणांनी मिरा पटेल यांच्या संपर्क साधला. त्यांना परदेशात शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन घेवून देतो, असे चार जणांनी आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून मिरा पटेल यांनी चार जणांनी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन ३ लाख ९८ हजार ४४२ रुपये बँक खात्यात जमा केले. ही घटना २८ ऑगस्ट २०२२ ते १० मे २०२३ या कालावधीत घडली. काही दिवसांनी मिरा पटेल यांच्या अ‍ॅडमिशनबाबत चार जणांशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यातून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.

स्वस्तात थायलंड पॅकेजचे लालच; वृद्धाला ८० हजाराला गंडविले
- Advertisement -

 थायलंड हॉलिडे पॅकेज स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका युवकाने वृद्धाला ८० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ते २३ जानेवारी २०२३ या कालावधीत स्वर रो हाऊस, भामरे हॉस्पिटलमागे, न्यू इरा शाळेजवळ, गोविंदनगर, नाशिक येथे घडली. याप्रकरणी सुशील राजाराम सोनवणे (वय ५७, रा. गोविंदनगर, नाशिक) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित रोहित शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील सोनवणे यांना परदेशात सहलीसाठी जायचे होते. ही बाब संशयित रोहित शर्मा यास समजली होती. त्याने सुशील सोनवणे यांना हॉलिडे पॅकेज स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवून सोनवणे यांनी शर्माच्या सांगण्याप्रमाणे फेडरल बँकेचे अकाऊंटमध्ये ८० हजार रुपये जमा केलेे. पैसे देवूनही संशयित शर्मा याने सोनवणे यांना थायलंड हॉलिडे पॅकेजचे तिकीट दिले नाही. सोनवणी यांनी तिकीटाबाबत विचारणा केली असता संशयिताने त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यातून फसवणूक झाल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -