घरमहाराष्ट्रअरे वाह! आदित्य ठाकरेंचा जागतिक डंका, यंग ग्लोबल लीडर्स यादीत समावेश

अरे वाह! आदित्य ठाकरेंचा जागतिक डंका, यंग ग्लोबल लीडर्स यादीत समावेश

Subscribe

Young Global Leaders | 40 वर्षांखालील तरुणांना एकमेकांकडून प्रेरणा घेता यावी आणि एकमेकांना विविध आव्हाने देता यावीत याकरता यंग ग्लोबल लीडर्सचे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह भारतातील सहा जणांना 14 मार्च रोजी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) द्वारे 2023 च्या यंग ग्लोबल लीडर्समध्ये (Young Global Leaders) म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसंच, TVS मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, Jio Haptik Technologies CEO आकृत वैश, BioZEEN CEO विपीन जोसेफ आणि Policy 4.0 Research Foundation CEO तन्वी रत्ना यांचाही या यादीत समावेश आहे.

40 वर्षांखालील जगातील सर्वात प्रॉमिसिंग यंग ग्लोबल लीडर्सची यादी जाहीर करताना WEF ने म्हटले की, आर्थिक योजना, तंत्रज्ञान, आरोग्यासाठी उपाययोजना, तसंच हवामान बदलासारख्या चळवळींमध्ये अग्रेसर असेलेल्यांना प्रॉमिसिंग यंग ग्लोबल लीडर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यासाठी नोबेल पारितोषिक प्राप्तकर्ते, राज्य प्रमुख, फॉर्च्युन 500 कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची या नावांची शिफारस करण्यात आली होती.

- Advertisement -

“या वर्षीच्या गटात जवळपास 100 आश्वासक राजकीय नेते, नाविन्यपूर्ण उद्योजक, संशोधक आणि दूरदर्शी कार्यकर्ते यांचा समावेश आहे. जे त्यांच्या समुदायात देशांमध्ये आणि जगामध्ये सकारात्मक बदलांना गती देतात,” असे जिनेव्हा स्थित WEF ने सांगितले.

- Advertisement -

40 वर्षांखालील तरुणांना एकमेकांकडून प्रेरणा घेता यावी आणि एकमेकांना विविध आव्हाने देता यावीत याकरता यंग ग्लोबल लीडर्सचे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. जेणेकरून तरुणांनी केलेल्या नव्या कल्पनांचा जागतिक स्तरावर प्रचार होऊ शकेल. २००४ सालापासून ही यादी जाहीर केली जाते. आतापर्यंत १२० देशातील १४०० पेक्षाही जास्त सदस्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

या यादीत शिंजिनी कुंडू (फिजिशियन-सायंटिस्ट, जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटल, यूएसए), फागुन ठकरार (संस्थापक, द पर्पज मूव्ही स्टुडिओ, यूके), अली अखाई (चेअरमन, मार्टिन डाऊ लिमिटेड, पाकिस्तान), स्मृती किरुबनंदन (एंगेजमेंट डायरेक्टर, टीसीएस), वरुण शिवराम (ग्रुप वरिष्ठ उपाध्यक्ष, स्ट्रॅटेजी अँड इनोव्हेशन, ऑर्स्टेड सर्व्हिसेस, यूएसए) आणि रूपा धट्ट (कार्यकारी संचालक, वुमन इन ग्लोबल हेल्थ, यूएसए) यांचाही या यादीत समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -