घरमहाराष्ट्रउद्योगमंत्री कोण आहेत?; गद्दार..., आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत टीका

उद्योगमंत्री कोण आहेत?; गद्दार…, आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत टीका

Subscribe

रत्नागिरी – आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यारवर आहेत. रत्नागिरीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद संधला. भाषणादरम्यान त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा गद्दार संबोधले. यावेळी आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी रंगली.

आदित्य ठाकरे काय म्हणाले –

- Advertisement -

वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला त्यावर आदित्य बोलत होते. तेव्हा त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा गद्दार संबोधले. उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला शिवसैनिकांना विचारला. त्यावर सभेसाठी जमलेल्या शिवसैनिकांनी गद्दार, असे उत्तर दिले. आदित्य यांनी 3 वेळा हा प्रश्न विचारला यावर शिवसैनिकांनी त्यांना गद्दार म्हणत दाद दिली.

डबल इंजिन सरकार असताना प्रकल्प राज्याबाहेर –

- Advertisement -

यावेळी आदित्य ठाकरेंकडून पन्नास खोके एकदम ओक्केच्या घोषणा देण्यात आल्या. गद्दार म्हणू नका असे निरोप पाठवले जातात, पण खोके सरकारला गद्दार नाही तर आणखी काय म्हणायचे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यात घाणेरडे राजकारण सुरू आहे. डबल इंजिन सरकार असताना प्रकल्प राज्याबाहेर गेला. गद्दार सरकारला विकास कामांची माहिती नाही. हे गद्दारांचे घटनाबाह्य सरकार आहे. ते खोक्यासाठी सरकार पाडल्याचे मान्यही करतात असा थेट हल्ला आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर यावेळी केला. स्वत:साठी खोके महाराष्ट्रासाठी धोके हेच या सरकारचे सत्य असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.

शिवसैनिकांच्या भरोश्यावर दौरा – 

आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिले आहेत. मात्र, त्यांना गाड्या दिलेल्या नाहीत. यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. माझ्या सुरक्षेसाठी किती सुरक्षारक्षक द्यायचे, त्यांना गाड्या द्यायच्या की नाही. हा प्रश्न सरकारचा आहे. त्यांची ती जबाबदारी आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. त्यांच्या भरोश्यावर मी हा दौरा करतोय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -