घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना शिवीगाळ केल्याबाबतचा दावा सत्तारांनी फेटाळला

मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना शिवीगाळ केल्याबाबतचा दावा सत्तारांनी फेटाळला

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला धक्का बसला. हे चिन्ह गोठवल्यानंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी राडा केल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या खासगी सचिवाला शिवीगाळ केल्याचे सांगितले जात होते. परंतु आज त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवीगाळ केल्याबाबतचा दावा फेटाळून लावला आहे.

शिवीगाळ वैगरे काहीच झाली नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही सर्व आमदारांनी कामं आणि काही अडचणी असतील त्याबद्दल चर्चा केली. मी सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा केली. परंतु कोणीतरी खोटी बातमी पसरवली हे मला माहिती नाही. अशा प्रकारच्या बातम्या समोर येताहेत हे पाहून मलाही आश्चर्च वाटलं, असं स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिलं.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना मांडायला सांगितल्या. त्याप्रकारे आम्ही त्या सूचना मांडल्या. त्यामध्ये स्थगितीचे आदेश होते. त्यांनी आदेश दिल्यानंतर कामांमध्ये विशेष लक्ष द्यावे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यांच सत्तार म्हणाले.

मी ४२ वर्षाचा राजकारणी आहे. मी शिवीगाळ कशी काय करू शकतो, ते खासगी सचिव आहेत. त्यांच्याबद्दल शिवीगाळ करण्याचा प्रश्नच नाही. निवडणुकीची आचारसंहिता पुढे लागू शकते. त्यामुळे कामे लवकरात लवकर करा, असं मी सांगितले. कारण आचारसंहिता लागली तर जे पैसे खर्च होणार आहेत ते सुद्धा लागणार नाहीत. त्यामुळे ही बातमी कोणी पसरवली मला नाहीत नाही, असं सत्तार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ही तर तुमच्या कर्माची फळं, इतरांवर खापर फोडू नका; भाजपची ठाकरेंवर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -