घरमहाराष्ट्रNH 4 वर भीषण अपघात, एकाच कुटुंबातले ६ ठार

NH 4 वर भीषण अपघात, एकाच कुटुंबातले ६ ठार

Subscribe

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून त्यात एकाच कुटुंबातले ६ जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर(NH 4) मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातल्या ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर त्यांची कार आदळल्यामुळे हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. मृत पावलेले सर्वजण सौदागर कुटुंबातील असून ते कर्नाटकच्या धारवाडचे रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने इतक्या भीषण अपघातामध्येही गाडीचा चालक आणि सौदागर कुटुंबातील एक चिमुरडी बचावली आहे. मात्र, ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ट

कार चालकाचा ताबा सुटला अन्…

मंगळवारी रात्रीच्या सुमारास हे सर्व कुटुंब धारवाडला परतत असताना हा अपघात झाल्याचं समजतंय. मध्यरात्रीच्या सुमारास काशीद गावाजवळ आल्यानंतर कारचालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही कार रस्त्यानजीकच्या एका झाडावर ही कार जाऊन आदळली. यामध्ये गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला. कारचालक आणि सौदागर कुटुंबातली एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातल्या ६ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक लहान मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -