Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गुन्हेगाराची पोलिसाला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप स्वतः टाकली सोशल मीडियावर

गुन्हेगाराची पोलिसाला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप स्वतः टाकली सोशल मीडियावर

Subscribe

जीवन केसरसिंग जारवाल राजपूत (वय २४ वर्षे) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. चोरी, जाळपोळ, दारु, वेश्याव्यवसाय यासह अनेक गुन्ह्यांची राजपूतविरोधात नोंद आहे. त्याने एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केली. तसेच त्या पोलीस अधिकाऱ्याला जीवेमारण्याची धमकीही दिली.

औरंगाबादः एका सराईत गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याला फोनवरुन शिवीगाळ केल्याचा प्रकार औरंगाबाद येथे घडला आहे. या फोनच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप त्या गुन्हेगारानेच सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. अखेर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवन केसरसिंग जारवाल राजपूत (वय २४ वर्षे) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. चोरी, जाळपोळ, दारु, वेश्याव्यवसाय यासह अनेक गुन्ह्यांची राजपूतविरोधात नोंद आहे. त्याने एका पोलीस अधिकाऱ्याला फोनवरुन शिवीगाळ केली. तसेच त्या पोलीस अधिकाऱ्याला जीवेमारण्याची धमकीही दिली. पीएसआय आहे म्हणून माजला का? तुझ्यात दम असेल तर मला अटक कर, माझ्यात दम आहे, तुला मी मारणार म्हणजे मारणारच आहे.माझी खूप लहान केस आहे, मला तुम्ही उगाच परेशान करू नका, मला अटक करा आणि आतमध्ये टाका हे तुम्हाला आधीच सांगितले होते. तुला दोन स्टार लागले म्हणजे तू डॉन झाला का?…मी एकटा येऊन तुला भिडतो, कुठ भिडायचं ते सांग…औरंगाबादमध्ये मी सहा ठिकाणी धंदे करतो. लपून-छपून मी धंदे करत नाही, असे राजपूतने पोलीस अधिकाऱ्याला सुनावले. या संभाषणाची ऑडिओ क्लिप त्याने स्वतःच्या सोशल मिडिया अकाऊंटवर टाकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी राजपूतला अटक करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार पोलिसांनी राजपूतचा शोध घेतला व सातारा येथून त्याला अटक केली. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. त्याने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे का?, याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

राजपूत हा अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चिकलठाणा पोलीसही त्याचा शोध घेत होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेकवेळा सापळा रचला. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. राजपूतचा शोध सुरु असतानाच पोलिसांना त्याचा साथीदार भेटला. त्या साथीदारानेच पोलिसांचे राजपूतसोबत बोलणे करून दिले. त्यावेळी त्याने पोलिसाला जीवे मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -