घरताज्या घडामोडीलहान मुलांच्या उपचारासाठी औषधसाठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा

लहान मुलांच्या उपचारासाठी औषधसाठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा

Subscribe

बालरोगतज्ज्ञांकडून पालकमंत्र्यांना अहवाल सादर

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होण्याचा धोका वैद्यकिय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभुमीवर जिल्हयातील बालरोगतज्ञ डॉक्टर्स संघटनेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत लहान मुलांच्या उपचारासाठी पुरेश्या प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

भुजबळ फार्म येथे झालेल्या बैठकीत कोरोनाची तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर लहान मुलांना संसर्ग झाल्यास करावयाचे उपचार, त्याप्रमाणे निर्माण करावयाच्या उपचार सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेच्या डॉक्टरांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या निवेदनात लहान मुलांमध्ये डेक्सामेथासोन, इमुनोग्लोबुलीन, पॅरॅसिटॅमोल यासह लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत, लहान मुलांना एको कार्डीयोग्राफी ही तपासणी करणारे तज्ञ उपलब्ध असावे यासह विविध मागण्या त्यांनी केल्या आहे. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होऊ शकतो असे तज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तिसर्‍या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य डॉक्टरांना करण्यात येईल. बालरोगतज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये बालरोग तज्ञांनी प्रशासनाला सहकार्य करून या तिसर्‍या लाटेत आपली महत्वपूर्ण अशी भूमिका पार पाडावी असे आवाहन करत डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारत्मक विचार करून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले.

- Advertisement -

यावेळी डॉ.राजेंद्र कुलकर्णी,डॉ.रविंद्र सोनवणे, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.रिना राठी, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.केदार मालवतकर, डॉ.सुशील पारख, डॉ.अमोल मुरकुटे, डॉ.गौरव नेरकर, डॉ.योगेश गोसावी, डॉ.संदीप वासनकर, डॉ.शाम हिरे, आकाश पगार, संदीप अहिरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -