घरमहाराष्ट्रनाशिकशेतकर्‍याची कल्पनाच न्यारी; पेपर अंथरण्याची किमया भारी

शेतकर्‍याची कल्पनाच न्यारी; पेपर अंथरण्याची किमया भारी

Subscribe

चांदवड येथील शेतकऱ्याने पाच हजार रुपयांत मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र केले तयार

नाशिकच्या चांदवड येथील शेतकर्‍याने लढवलेली शक्कल सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरतेय. आडगाव टप्पा येथील या तरुण शेतकर्‍याने केवळ पाच हजार रुपयांत मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र तयार केले असून त्याद्वारे कमी मनुष्यबळात आणि कमी खर्चात पेपर अंथरण्याचे महत्त्वपूर्ण काम पार पडत आहे.

सध्या सर्वत्र शेतकर्‍यांची टोमॅटो लागवडीसाठी मशागत अन् त्यानंतर सरी पाडणे, त्यावर मल्चिंग अंथरणे ही कामे वेगाने सुरू आहेत. यात मल्चिंग अंथरणे हे महागडे व जास्त मजुरांचे किंवा ट्रॅक्टरचलीत यंत्राचेच काम डोकेदुखी ठरते. आडगावच्या नितीन घुलेंचीदेखील हीच धावपळ, त्यात कोरोना काळ असल्याने मजुरांनी मल्चिंग पेपर अंथरायला यायला नकार दिला. शिवाय मल्चिंग पेपर अंथरायला किमान सहा मजरांची गरज होती. पण ते मिळाले नाहीच. अखेर या तरुण अन् होतकरू शेतकर्‍याने अडचणींवर मात करण्यासाठी अत्यंत कमी बजेटमध्ये मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्रच विकसीत केले. त्यांनी घरीच हे यंत्र बनवले, ज्याला केवळ पाच हजार रुपये खर्च आला. शिवाय याचा विशेष मेंटेनन्सदेखील करावा लागत नाही. यामुळे मजुरी तर वाचते पण ट्रॅक्टरला महागडे यंत्र घेण्याची आवश्यकता नाही. मुख्य म्हणजे, पैसे अन् वेळेची बचत होते.

- Advertisement -

हे मशीन वजनाने हलके असल्याने दोन माणसे ते सहज ओढू शकतात. पेपरदेखील एकसारखा प्रमाणात अंथरला जात असल्याने योग्य पद्धतीने काम होते. नितीन घुले हे स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत. ते सध्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिर, धोंडगव्हाण या शाळेत कार्यरत आहेत. आई-वडिलांना मदत म्हणून ते शेतीची जबाबदारीदेखील सांभाळतात. सतत नाविन्यपूर्ण करण्याकडे त्यांचा
कल असतो.

 

- Advertisement -

मजूर टंचाईवर मात करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार असल्याने भाजीपाला पिकांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. भविष्यात शेतकर्‍यांना हे यंत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
– नितीन घुले, आडगाव टप्पा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -