घरताज्या घडामोडीOmicron: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, आदित्य ठाकरेंचं आवाहन

Omicron: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, आदित्य ठाकरेंचं आवाहन

Subscribe

केंद्र सरकारने तसेच स्थानिक महापालिकांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असली तरीही घाबरण्याची गरज नसून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केले. परिस्थिती पाहून नियमावली कठोर करायची की नाही त्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले .
करोना व्हायरसचा नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यातही ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील ओमायक्रॉन परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. केंद्र सरकारने तसेच स्थानिक महापालिकांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही केवळ विमानतळांवर, एंट्री पॉइंट अशाच नव्हे तर शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात चाचणी करत आहोत . दर आठवड्याला कॉर्पोरेट कार्यालयांनी आरटीपीसीआर करावे असे सांगत ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचेही ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्यात नविन नियमावली लावणार का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात पुढच्या दोन-तीन दिवसात परिस्थिती पाहून नियमावली कठोर करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या लग्न समारंभांवरही कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र करोनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, असंही आदित्य ठाकरे यांनि सांगितले.


हेही वाचा – Covid-19: भविष्यात येणारी महामारी कोरोनापेक्षाही घातक, ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या संशोधकांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -