घरCORONA UPDATECovid-19: भविष्यात येणारी महामारी कोरोनापेक्षाही घातक, ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या संशोधकांचा इशारा

Covid-19: भविष्यात येणारी महामारी कोरोनापेक्षाही घातक, ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या संशोधकांचा इशारा

Subscribe

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ५२.६ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जग सध्या कोरोना महामारीचा सामना करत आहे. कोरोनाने लोकांना आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी शिकवल्या. मात्र भविष्यात येणारी महामारी ही कोरोनापेक्षाही भयंकर आणि घातक असल्याचे ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लस तयार करणाऱ्या कंपनीचे संशोधक साराह गिल्बर्ट यांनी म्हटले आहे. जगातील भविष्यात येणाऱ्या महामारिला दोन हात करण्यासाठी लोकांनी आतापासूनच तयार रहावे असे त्यांनी म्हटले आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंट समोर कोरोना विरोधी लसीकरणाचा प्रभाव देखील कमी होईल. जान्स हापकिन्स युनिव्हरसिटीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ५२.६ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, रिचर्ड डिम्बेल्बी व्याख्यानात सारा गिलबर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगात येणारी पुढील महामारी ही कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असू शकते. या महामारीत सर्वाधिक संसर्ग आणि अधिक प्राणघातक असून शकते. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, जगाने भविष्यात येणाऱ्या महामारीसाठी आतापासून चांगली तयारी केली पाहिजे. नाहीतर जगाने आतापर्यंत मिळवलेले ज्ञान आणि प्रगती वाया जाईल.

- Advertisement -

आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारी संपवण्याचे जगाचे प्रयत्न अर्धवट राहिले आहेत. लसींचे उत्पन्न कमी असलेल्या देशांमध्ये लसी मर्यादित आहेत. मात्र श्रीमंत देशांमध्ये लसीचा बूस्टर डोस देखील देण्यात येत आहे.

गिलबर्ट यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमुळे हा व्हेरिएंट संक्रमण वाढवू शकतो. मात्र कोरोना विरोधी लसींमुळे तयार होणाऱ्या अँटिबॉडीज हा संक्रमण कमी करू शकतात. ओमिक्रॉनविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे ती माहिती मिळेपर्यंत या व्हेरिएंटशी लढण्यासाठी त्याचा प्रसार कमी करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron बोंबला, सिंगापूर अहवालाने डोकेदुखी वाढवली, कोरोनामुक्तांना संसर्गाचा सर्वाधिक धोका

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -