घरमहाराष्ट्रकाश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' युवा सैनिकांवर कारवाई

काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ युवा सैनिकांवर कारवाई

Subscribe

यवतमाळ येथे काश्मिरी विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या त्या युवासैनिकांना काढून टाकण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. काल हा निर्णय घेण्यात आला होता. आज आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.वाघापूर परिसरातील वैभवनगर येथे बुधवारी रात्री युवासेनेच्या १० ते १२ कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

- Advertisement -

पुलवामा येथे झालेल्या दहशत वादी हल्ल्यानंतर देशात काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडून आले. यवतमाळ येथे या प्रकराचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. यानंतर अचारसंहितेचे नियम पाळून काम करा असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -