नाणार होणार मात्र नव्या जागेत, राज्य सरकार सकारात्मक असल्याबाबत आदित्य ठाकरेंची माहिती

विदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची डायव्हिंग बोट वापरली जाते. याच धर्ती वर ही बोट आहे. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणि केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम सीटिंग व्यवस्था असणार आहे.

aditya thackeray said Nanar will be in a new place and armar boat handover
नाणार होणार मात्र नव्या जागेत, राज्य सरकार सकारात्मक असल्याबाबत आदित्य ठाकरेंची माहिती

नाणार रिफायनरी प्रकल्प होणार आहे. मात्र तो नव्या जागेत होईल अशी माहीती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण येथे बोलताना दिली आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे असेही ते यावेळी म्हणाले. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवणमध्ये आलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाणार होणार असे स्पष्ट सांगितले आहे.

शिवसेनेची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी जनतेचा विरोध आहे त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प रेटून न्यायचा नाही. शाश्वत विकासाची भूमिका लक्षात घेता ज्या ठिकाणी विरोध होणार अशा ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी तो प्रकल्प करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यांच बरोबर तो महाराष्ट्राबाहेर जाऊ नये असेही धोरण असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या हस्ते अत्याधुनिक बोटीचे उदघाटन

जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्टसला (इसादा) देण्यात आलेल्या अत्याधुनिक बोटीचे राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. राज्यातील साहसी पर्यटनाला चालना देणे, स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करणे आणि साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी बनविणे यासाठी मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्टसच्या (इसादा) माध्यमातून निवती रॉक जवळील समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक बोट दाखल करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिला टप्पा आहे.

विदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची डायव्हिंग बोट वापरली जाते. याच धर्ती वर ही बोट आहे. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणि केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम सीटिंग व्यवस्था असणार आहे. रात्रीच्या स्कुबा डायव्हिंगसाठी या बोटीवर आधुनिक यंत्रणा असणार आहे. मालवण येथील एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हिंग सेंटर मधून पर्यटकांना नीवती रॉक जवळील समुद्रात दर्जेदार स्कुबा डायव्हिंग घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. परंतु नीवती रॉक जवळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक बोटीची गरज भासत होती.

आंध्रप्रदेश मधील पुद्दुचेरी येथील शिपयार्ड मधून ही बोट घेऊन डॉ. सारंग कुलकर्णी निघाले. एकूण १८०० किलोमिटरचां हा प्रवास आहे. पाच राज्यांमधील रामेश्वर, कन्याकुमारी, कोचीन, मंगळूर, कारवार असा प्रवास करून ही बोट मालवणमध्ये आणण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते.


हेही वाचा : भाजप नेत्यांना नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे वाटतात- काँग्रेस