Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत - आदित्य ठाकरे

दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत – आदित्य ठाकरे

केंद्र सरकारकडून चेंबूरमधील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत तर जखमी नागरिकांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा

Related Story

- Advertisement -

मुंबईत रविवारच्या पूर्वसंध्येला सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये घरांवर दरड कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा हा २५ वर गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. धोकादायक परिस्थितीमध्ये असणाऱ्या नागरिकांचे तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलातर करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

चेंबूरमधील दरड कोसळ्याच्या दुर्घटनेची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली आहे. मुंबईत रात्री जास्त पाऊस पडल्यामुळे दरड कोसळी आहे. पावसाचे पाणी जास्त आल्यानं मिठी नदीनंही धोक्याची पातळी गाठली आहे यामुळे तिथल्या नागरिकांनाही स्थलातरण करण्यात आले आहे. चेंबूरमध्ये संरक्षण भींतीवर पाण्याचा जोर आल्यामुळे ही भींत कोसळली आहे. यामध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख आपत्ती व्यवस्थापनमधून तर १ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असे ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडे याबाबत मदतीची मागणी करण्यात येणार आहे. जे चेंबूरमध्ये घटनास्थळी राहत असलेल्या इतर नागरिकांचाही जीव धोक्यात आला आहे. यामुळे या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत जे गंभीर जखमी आहेत अशा रुग्णांचा खर्च हा शासनाकडून करण्यात येणार आहे. यातील काही नागरिकांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरु करण्यात आला आहे. त्या सर्वांचा खर्च हा शासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दुर्घटनेची माहिती घेऊन त्वरित पीएम नॅशनल रिलीफ फंडमधून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमी झालेल्या नागरिकांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

साखर झोपेत असताना कोसळली भींत

- Advertisement -

मुबईत शनिवार रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतुक विस्कळीत झाली आहे. तर मुंबईतील भांडूप, चेंबूर आणि विक्रोळी येथे संरक्षण भींती कोसळ्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये रात्री साखर झोपेत असताना नागरिकांवर काळाचा घाला आला. संरक्षण भींतीवर पाण्याचा दबाव वाढल्यामुळे भींत कोसळली आणि घरांवर पडली यामुळे या नागरिकांचा भींतीखाली दबून मृत्यू झाला आहे. मध्यरात्री ही घटना घडली असल्यामुळे जास्त जिवीतहानी झाली आहे.

- Advertisement -