घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २ हजारांची वाढ, मृतांची संख्या...

India Corona Update : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २ हजारांची वाढ, मृतांची संख्या घटली

Subscribe

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज पून्हा वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसरी लाटेचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली रुग्णसंख्या पुन्हा ४० हजारांच्या पार पोहचली आहे. यात शनिवार नोंद झालेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत आज २ हजारांची वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार १५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५१८ कोरोनाग्रस्तांनी प्राण गमावले आहेत. यात दिलासाजनक बाब म्हणजे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत एकूण ४२ हजार ००४ कोरोना रुग्ण बर हऊन घरी परतले आहेत. त्यामुळे देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ कोटी २ लाख ६९ हजार ७९६ वर पोहचली आहे.


मुंबईतील मृतांच्या आकड्यात घट पाहयाला मिळत असून आत्तापर्यंत देशात ४ लाख १३ हजार ६०९ रुग्णांचा कोरोना मृतांचा नोंद झाली आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या अधिक असली तरी सध्याच्या घडीला देशात फक्त ४ लाख २२ हजार ६६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर देशात आत्तापर्यंत ४० कोटी ४९ लाख ३१ हजार ७१५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार,देशात आतापर्यंत ४४ कोटी ३९लाख ५८ हजार ६६३ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात त्यातील १९ लाख ३६ हजार ७०९ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -