घरताज्या घडामोडीअफझल खान कबरीच्या आतिक्रमणाविरोधातील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अफझल खान कबरीच्या आतिक्रमणाविरोधातील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Subscribe

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळ अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम गुरूवारी सातारा जिल्हा प्रशासनाद्वारे हटवण्यात आले. या कारवाईनंतर राज्याच वादाची ठिणगी उडाली आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळ अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम गुरूवारी सातारा जिल्हा प्रशासनाद्वारे हटवण्यात आले. या कारवाईनंतर राज्याच वादाची ठिणगी उडाली आहे. तसेच, या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (afzal khan tomb encroachment demolished petition against administrative action in sc)

अफझल खान स्मारक समितीकडून निजाम पाशा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरन्यायाधीशांच्या पीठासमोर या यचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी काय आदेश देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

या याचिकेमध्ये अफझल खानाच्या कबरीसमोरचे अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकाला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने गुरुवारी कोणतेही आदेश देण्याऐवजी सविस्तर शुक्रवारी सुनावणी करू असे म्हटले होते.

अफझल खानाची कबर 1959 मध्ये बांधली होती अशी माहिती याचिकेत देण्यात आलीय. यासंदर्भात उच्च न्यायालयाचेसुद्धा काही जुने निर्णय आहेत. तसंच अफझल खानाची कबर असलेल्या परिसरातली जमीन ही वनखात्याची आहे. त्यामुळे इथल्या अतिक्रमणाचा मुद्दा आहे.

- Advertisement -

दरम्यान, 1980 ते 85 या कालावधीत अफझलखानाच्या कबरीजवळ अतिक्रमण व्हायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते. याठिकाणी उरूसही भरवण्यात आला होता. त्यानंतर या कबरीचे दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती.


हेही वाचा – भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा, संजय राऊतांचे मोदी-शाहांना आवाहन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -