घरमहाराष्ट्र'मित्र'च्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

Subscribe

राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेश विकास साधण्यासाठी 'मित्र'ची स्थापना राज्य सरकारने केली आहे. या संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पदरचना यापूर्वीच करण्यात आलेली आहे.

मुंबई – निती आयोगाच्या (Niti Committee) धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय आशर यांना बांधकाम क्षेत्र, सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. तर, राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी? चंद्रपूर, सिंधुदुर्गात खनिकर्म विभागाकडून शोधकाम सुरू

- Advertisement -

भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २०४७ पर्यंत विकसित भारतचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्ताने राज्यांनाही विकसित करण्याचे केंद्र सरकारने सूचना केल्या आहेत. यासाठी २०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलिअन डॉलर आणि २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलिअन डॉलर करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र)ची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा – राज ठाकरेंचा आरोप धादांत खोटे; अजित पवारांचे प्रत्युत्तर

- Advertisement -

राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेश विकास साधण्यासाठी ‘मित्र’ची स्थापना राज्य सरकारने केली आहे. या संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पदरचना यापूर्वीच करण्यात आलेली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -