घरमहाराष्ट्रपुत्रहट्टापुढे अजित पवारांचे चालेना, इंग्रजी ट्विटमुळे ट्रोलर्सकडून खिल्ली

पुत्रहट्टापुढे अजित पवारांचे चालेना, इंग्रजी ट्विटमुळे ट्रोलर्सकडून खिल्ली

Subscribe

एप्रिलपासून अजित पवार यांचे ट्विटर हँडल त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी चालवायला घेतल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या ट्विटवर पार्थ यांची छाप पडलेली दिसते. अजित पवार यांची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मिती करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या खमक्या वृत्तीमुळे प्रंचड लोकप्रिय आहेत. अजित पवारांच्या बोलण्यात ग्रामीण भाषेतला लहेजा असल्यामुळे ते शेतकर्‍यांना आपलेसे वाटतात. पत्रकार परिषदेतही पत्रकारांनी मराठीतच प्रश्न विचारावेत, असा त्यांचा आग्रह असतो. ट्विटरवर आल्यापासूनही अजित पवार मराठीतच ट्विट करत होते. मात्र, एप्रिल २०१८ पासून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी त्यांचे ट्विटर हँडल स्वतः चालवायला घेतले. तेव्हापासून अजितदादांच्या ट्विटमध्ये कॉन्व्हेंट भाषा दिसायला लागली. अर्थातच त्यांच्या चाहत्यांनी याबद्दल थेटपणे नाराजी व्यक्त केली. पण त्याचबरोबर अजितदादांनी मराठीतच बोलणे कसे गरजेचे आहे, याबद्दल ट्विट करून त्यांना सूचनाही करण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न

आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की शक्यतो राष्ट्रीय विषयांवर बोलणे अजित पवार टाळत आले आहेत. एप्रिल २०१८ पासून अजित पवार यांच्या (twitter.com/AjitPawarSpeaks) ट्विटर हँडलवरुन अनेकवेळा हिंदी आणि इंग्रजीमध्ये राष्ट्रीय विषयांवरील ट्विट केलेले दिसून येतात. एप्रिलपासून अजित पवार यांचे ट्विटर हँडल त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी चालवायला घेतल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या ट्विटवर पार्थ यांची छाप पडलेली दिसते. अजित पवार यांची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मिती करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र अजित पवार यांना ते कितपत रुचले असेल याबाबत शंकाच आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंचे ट्विट कधी ट्रोल होत नाहीत

राज्याच्या राजकारणात अजित पवार आणि राष्ट्रीय राजकारणात सुप्रिया सुळे, अशी विभागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक भूमिकांवरुन याआधी दिसलेली आहे. सुप्रिया सुळे त्यांच्या ट्विटरवर मराठी, इंग्रजी भाषेत ट्विट करतात. सुप्रिया सुळे यांचा तोंडवळा शहरी आणि ग्रामीण असा दोन्हीकडे समतोल साधणारा असल्यामुळे त्यांचे इंग्रजी भाषेतील ट्विट कधी ट्रोल होत नाहीत.

नेटिझन्सनी केले मजेशीर ट्विट

ajit pawar trolled on tweeter
नेटिझन्सनी काही मजेशीर ट्विट केले

अजित पवार यांनी केलेल्या इंग्रजी ट्विटखाली नेटिझन्सनी काही मजेशीर ट्विट केले आहेत. त्यांनी मराठीत ट्विट केले तर आपुलकी वाटते. इंग्रजीत आपुलकी वाटत नसल्याचे युजर्सनी म्हटले आहे. तर काहींनी अजितदादांच्या इंग्रजी ट्विटवर नक्की ते स्वतःच ट्विट करतात का, अशी शंका व्यक्त केली आहे. विटी-दांडू खेळल्याची एक मराठी बातमी शेअर करुन अजित पवार यांनी इंग्रजीत ट्विट केले. या ट्विटवरही अनेकांनी निशाणा साधला. किमान विटी-दांडूचा उल्लेख तरी गिल्ली-दंडा असा करून हिंदीचे मिंधे बनू नका, अशी विनंती एका ट्रोलरने केली.

- Advertisement -
ajit pawar trolled on tweeter
ट्विट करून त्यांना सूचनाही दिल्यात
ajt pawar trolled on tweeter
अजित पवार ट्विटरववर ट्रोल

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंचेही इंग्रजीलाच प्राधान्य

शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठी भाषेचा कैवार घेत राजकारण करणार्‍या पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील ट्विटरवर इंग्रजी भाषेलाच प्राधान्य देतात. त्यांनाही मध्यंतरी मराठी भाषिकांनी ट्रोल केल्यावर आता त्यांनी काही ट्विट मराठी भाषेतून करण्याला सुरुवात केली. मात्र त्यांचे आजही जास्तीत जास्त ट्विट हे इंग्रजी भाषेतच असतात.

अजित पवार यांची अधिकृत भूमिका ट्विटरद्वारे मांडली जाते. आपल्या हँडलवरुन कोणते ट्विट जात आहेत, याची कल्पना त्यांना आहेच. राष्ट्रीय विषय आणि राज्याबाहेरील बुद्धिजीवी वर्गाला दादांचे मत समजावे, त्यासाठी काही ट्विट इंग्रजीत केले जात आहेत. राज्यातील विषयावर ते मराठीतच ट्विट करतात.

– आनंद परांजपे, सोशल मीडिया प्रभारी, राष्ट्रवादी काँग्रेस.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -