राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा, कोरोना बैठकीनंतर अजित पवारांची माहिती

राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. जे व्हॅक्सिनेशन तीन तारखेपासून सुरू केलंय. तसेच इतर लोकांसाठी सुद्धा दहा तारखेपासून सुरू करण्यात आलंय. ग्रामीण भागात विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींची संख्या मोठ्या प्रमाणात पहिल्या व्हॅक्सिसीनची करण्यात आली आहे. तसेच तेथील शाळांमध्ये मुलांना बोलावलं जातं आणि व्हॅक्सिनेशन केलं जातं. त्यामुळे पुणे आणि पिंपरीं-चिंचवड शहरातील देखील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून व्हॅक्सिनेशन केलं तर ते मोठ्या प्रमाणात होईल. कारण ४३ टक्क्यांपर्यंत आज लसीकरण पूर्ण झालंय. तसेच आपल्याकडे व्हॅक्सिनेशन सुद्धा उपलब्ध आहे. राज्यातील काही भागांत व्हॅक्सिनेशन उपलब्ध नसलं तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उपलब्ध आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते म्हणाले की, ज्या व्हॅक्सिन घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्याची सुरूवात तीन जानेवारी आणि दहा जानेवारीपासून करण्यात आली आहे. त्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींनी व्हॅक्सिन घ्यावी. परंतु दुसरं व्हॅक्सिन उशीरा घेतल्यामुळे बूस्टर डोस घेण्याची संख्या कमी प्रमाणात पहायला मिळत आहे. पोलिसांसोबत चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे कोरेगाव-भीमा बंदोबस्तवेळी पोलीस गेल्यानंतर मुंबई आणि पुण्यामध्ये पोलीस कोरोनाग्रस्त झालेले होते. त्याबद्दल काही पाऊलं पोलीस दलाने उचलली. आता मात्र परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे फक्त पॉझिटिव्ह अहवालामधील तीनच पोलीस रूग्णालयात दाखल झाले आहेत.

सेल्फ टेस्टिंग किटबाबत विक्रेत्यांनी माहिती ठेवावी

शहरी भागामध्ये एक नवीन कीट मार्केटमध्ये आलंय. ते कीट मेडिकल शॉपमध्ये उपलब्ध आहेत. परंतु त्यामुळे कोरोनाची चाचणी नागरिक स्वत:हून करत आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हबाबत टेस्टिंग केलं तर त्याच्या संदर्भातील माहिती समजते. मात्र, प्रत्येक नागरिकाने ते घरातूनच केलं तर त्यांसंबधीत माहिती आम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे सरकारतर्फे आम्ही एक निर्णय घेऊ इच्छितो की, जे मेडिकल शॉपमधून अशा किट उपलब्ध होत आहेत. त्यांनी आपला मोबाईल नंबर किंवा नाव द्यावं. जेणेकरून त्यांना फोन करून पॉझिटिव्ह किंवा निगेटव्हबाबत परिस्थिती आणि माहिती घेता येईल.

पुणे जिल्ह्यात १०.६ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट

नॅशनल हेल्थ मिशन मागील काळात संपूर्ण देशपातळीवर ते फंड्स देत होते. परंतु आता त्यांनी हे फंड्स थांबवले आहेत. त्यामुळे मी एसबीआयमधून पैसे द्यायचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याला ९ कोटी रूपये, सोलापूरला १० कोटी रूपये आणि साताऱ्याला १० कोटी रूपये, अशा पद्धतीने पैसे देण्यात आलेले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात १०.६ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. साधारणत: ३० हजार कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.


हेही वाचा : उज्ज्वला योजनेचे गॅस सिलिंडर परत करून मोदी सरकारचा निषेध करणार – संध्याताई सव्वालाखे