घरताज्या घडामोडीपुण्यातील ५ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त, दुसरा डोस न घेणाऱ्यांविरोधात अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश

पुण्यातील ५ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त, दुसरा डोस न घेणाऱ्यांविरोधात अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश

Subscribe

राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सापडला होता. यानंतर एक रुग्ण पुण्यात आढळला होता. पुण्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या एकूण ६ वर गेली होती. पुण्यात आढळलेल्या १ ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच इतर ४ रुग्णही ओमिक्रॉन मुक्त झाले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालमकंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुण्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पहिल्या डोसचे लसीकरण १०० टक्के झाले आहे. परंतु दुसरा डोस न घेणाऱ्यांविरोधात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांनी जिल्ह्यातील कोरोना लसीकरण वाढवण्यावर भर दिला आहे. पुण्यात ज्या तालुक्यांमध्ये लसीचा डोस घेण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर कडक निर्बंध लागू करण्याबाबत विचार सुरु आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन गर्दी आणि कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात येतील असेही अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

ओमिक्रॉनबाधित ५ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

पुण्यातील १ आणि पिंपरी चिंचवड मध्ये ४ अशा ५ ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. राज्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण ६ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली होती. यातील पुण्यात १ रुग्ण होता तर पिंपरी चिंचवडमध्ये ५ रुग्ण होते अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दुसऱ्या डोससाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा नागरिकांचे दोन डोस कसे पूर्ण करता येईल यावर भर देण्यात आला आहे. पहिल्या डोसचे लसीकरण जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु दुसरा डोस घेण्यास नागरिक पुढे येत नाही असे दिसत आहे. बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात दुसऱ्या डोसची संख्या कमी पाहायला मिळाली आहे. जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अधिकारी यांना आदेश देण्यात आला आहे की, आरोग्य यंत्रणेला कामाला लावा, लसीकरणाचा कार्यक्रम राबवा, मोबाईल व्हॅन लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. ठराविक तालुक्यात दुसऱ्या लसीच्या डोसची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश दिले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

बुस्टर डोसबाबत केंद्राने निर्णय घ्यावा

बुस्टर डोसबाबत प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले की, राज्यात पहिल्यांदा दोन डोस कसे देता येईल यावर भर दिला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाचा त्रास होत नाही असे सिद्ध झाले आहे. काही ठिकाणी बुस्टर डोस घेतले त्यांना त्रास झाला आहे. परंतु बुस्टरचा डोस देण्याचा निर्णय देश पातळीवर घेण्यात येईल. तिसऱ्या डोसचे व्हॅक्सिन सिरमकडे उपलब्ध आहे. केंद्र सरकारने बुस्टर डोस देण्याबाबत निर्णय घ्यावा असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.


हेही वाचा : ओमिक्रॉनचा कहर! वर्क फ्रॉम होम, मास्क अन् वॅक्सीन पास; ‘या’ देशात नवे नियम लागू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -